बड्या मद्य उत्पादक कंपनीस महाराष्ट्र राज्य जीएसटी विभागाकडून ₹263.7 कोटींचा मागणी आदेश

GST 4 YOU

राज्य कर उपायुक्त, जीएसटी  
रायगड विभाग, महाराष्ट्र यांनी युनायटेड ब्रुअरीज लि. या मद्य निर्मिती क्षेत्रातील बड्या कंपनीला जीएसटी न भरल्या बद्दल  आर्थिक वर्ष  2019-20 साठी एकूण रू.119.82 कोटी चा कर तसेच रू.115.03 कोटी व्याज आणि  रू 28.86 कोटींचा चा दंड असे एकूण  ₹263.7 कोटी आकारण्याचे आदेश पारित केले.
   तेलंगणा स्टेट बेव्हरेज कॉर्पोरेशन , कर्नाटक स्टेट बेव्हरेज कॉर्पोरेशन आणि  आंध्र प्रदेश स्टेट बेव्हरेज कॉर्पोरेशन  यांचे वरील जारी  डेबिट नोट्सवर 60 टक्के सीएसटी आकारल्याच्या कारणास्तव मागणी आदेश जारी करण्यात आला आहे. 
एप्रिल 2019 ते मार्च 2020 या कालावधीसाठी स्टेट बेव्हरेज कॉर्पोरेशन्सच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क अदा केले गेले ,त्याच्या डेबिट नोट्स संदर्भातील हा कर आहे.
    कंपनी संबंधित आदेशा विरुद्ध वैधानिक प्री-डिपॉझिट भरून  योग्य त्या अपील प्राधिकरणासमोर  अपील दाखल करणार असून याचा  कंपनीवर कोणताही आर्थिक परिणाम अपेक्षित नाही असे प्रतिपादन कंपनीच्या वतीने केले आहे.
विशेष म्हणजे, सदर कंपनीस कर अधिकाऱ्यांकडून अशा आदेशाला सामोरे जावे लागल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी ही या मद्य कंपनीस 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 275 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.