जीएसटी कर दात्याचे म्हणणे विचारात न घेता जारी केलेले DRC-07 आदेश मा. मद्रास उच्च न्यायालयाने केले रद्द

GST 4 YOU

मा. मद्रास न्यायालयाने  में संतोष कुमार भावेशा बोथरा वि. राज्य वाणिज्य कर आधिकारी, उदगमंडलम (W.P.7698 /2024,) या केस मधील  विवादात याचिकाकर्त्या करदात्याचे म्हणणे विचारात न घेता वस्तू आणि सेवा कर (GST) अधिकाऱ्यांनी जारी केलेला DRC-07 आदेश रद्द केला आणि हे प्रकरण फेरविचारासाठी परत पाठवले. प्रतिवादी ने याचिकाकर्त्याला  कारणे दाखवा नोटीस जारी केली होती  तथापि, याचिकाकर्त्याने आपले म्हणणे सादर करूनही ते विचारात  न घेता आदेश जारी करण्यात आल्याने   सदर रिट याचिका दाखल केली होती. 
   सरकारतर्फे युक्तिवाद केला की याचिकाकर्त्याला सूचना, कारणे दाखवा नोटीस आणि वैयक्तिक सुनावणी/ स्मरणपत्र नोटीससह विविध नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.  ज्याद्वारे याचिकाकर्त्याला पुरेशी संधी उपलब्ध होती.
     आदेश जारी करण्यापूर्वी याचिकाकर्त्यचे दावे विचारात न घेतल्याचे लक्षात घेऊन, न्यायालयाने जारी आदेश बाजूला ठेवणे आवश्यक मानले. 
मा. न्यायालयाच्या एकल खंडपीठाने या प्रकरणाचा फेरविचार करण्यासाठी याचिकाकर्त्याला सर्व संबंधित कागदपत्रांसह कारणे दाखवा नोटीसला उत्तर सादर करण्यासाठी न्यायालयाचा आदेश मिळाल्यापासून 15 दिवसांचा कालावधी दिला.याचिकाकर्त्याचे उत्तर मिळाल्या पासून दोन महिन्यांच्या आत नवीन आदेश जारी करण्यापूर्वी याचिकाकर्त्याला वैयक्तिक सुनावणीसह वाजवी संधी प्रदान करण्याचे निर्देश प्रतिवादी जीएसटी विभागास देण्यात आले.