मा. केरळ हायकोर्टाने मे. पुथापरंबिल शेरीफ शनवास वि. राज्य कर अधिकारी (W.P.(C) 3970/2024) या केस मध्ये याचिकाकर्त्याने जीएसटी विभागाची इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करण्याची सूचना रद्द करण्याची मागणी रिट याचिके द्वारे केली होती. वस्तू आणि सेवा कर नियम, 2017 (सीजीएसटी) च्या नियम 86A नुसार इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमध्ये उपलब्ध असलेली रकम काही अटीं वर वापरता येते . त्या नियमाच्या उप-नियम (1) अंतर्गत आयुक्त किंवा त्यानी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याला जर इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मधील रक्कम नाकारण्याच्या अटी बद्दल खात्री झाली तर त्या क्रेडिट लेजर मधून कर रकमेचे डेबिट तो नाकारू शकतो .
या केस मध्ये सरकारी वकीलानी म्हणणे सादर करताना याचिकाकर्त्याने इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा कोणत्याही वस्तू आणि सेवांचा पुरवठा न करता बनावट इनव्हॉइसच्या आधारे केला असून त्यामुळे सक्षम अधिकाऱ्याकडे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा बोगस आहे यावर विश्वास ठेवण्याचे कारण आहे,असे प्रतिपादन केले .
मा. केरळ न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की याचिकाकर्त्यावरील आरोपा नुसार इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा कोणत्याही मालाचा किंवा सेवा यांचा पुरवठा न करता बनावट पावत्याच्या आधारे करण्यात आला आहे. मा. न्यायालयाच्या एकल खंडपीठाला असे आढळून आले की जारी सूचना ही योग्य अधिकारात आणि जीएसटी कायदा तसेच त्याखालील नियमांनुसार प्रदान केलेल्या अधिकारां नुसार आहे. त्या मुळे सदर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) दावा फसवा असून तो बनावट चलनाच्या आधारे केला असल्याने तो नाकारण्यात आला. यास्तव या नोटीसमध्ये हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्यामुळे, न्यायालयाने सदर रिट याचिका फेटाळून लावली आणि नोटिसी वर निर्णय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश न्याय-निर्णयन प्राधिकार्यास दिले.