महारेरा चा ऐतिहासिक निर्णय- वेळेवर पैसे न देणाऱ्या ग्राहकांचे बुकिंग रद्द करण्याचे आदेश

GST 4 YOU

महाराष्ट्र स्थावर संपदा नियमन प्राधिकरण (रेरा) ने ग्राहकांनी विकासकाचे पैसे न दिल्यामुळे विकासकाच्या याचिकेवर निर्णय देताना सदर ग्राहकांनी पैसे न दिल्यामुळे त्यांचे बुकिंग रद्द करावे असे आदेश दिले.
     बऱ्याचदा ग्राहक हे त्यांच्या समस्यांसाठी रेरां कडे तक्रारी करतात .मात्र आता रेराने  विकासकाची न्यायोचीत बाजू ग्राह्य धरली आहे.
   या केस मध्ये 2019 मध्ये सदर फ्लॅटधारक नऊ ग्राहकांनी विकासकाबरोबर  करार केल्यानंतर फक्त दहा ते वीस टक्के रक्कम जमा केली , पण स्टेज नुसार पेमेंट केले नाही आणि डिमांड नोटीस दिल्यानंतरही पैसे भरणे टाळाटाळ केली . विकासकाने या बाबत महारेरा कडे  तक्रार दाखल केल्यानंतर महारेरा ने बुकिंग रद्द करण्याबद्दल सूचना दिली असता नऊ पैकी पाच ग्राहकांनी पैसे भरले मात्र चार  ग्राहकांनी पैसे न भरल्यामुळे महारेराने त्यांचे बुकिंग रद्द करण्याचे आदेश दिले.
    महाराष्ट्र रेरा कायद्याच्या कलम १९(६) नुसार प्रत्येक ग्राहकास त्याने प्लॉट, दुकान गाळे किंवा फ्लॅटसाठी केलेल्या एग्रीमेंट टू सेल मध्ये  ठरल्याप्रमाणे आणि वेळेनुसार विकासाकास पेमेंट करणे बंधनकारक आहे हे या निर्णया मुळे स्पष्ट झाले.