देशात महिलानी चार्टर्ड अकाउंटट (CA) च्या क्षेत्रात एक उल्लेखनीय टप्पा गाठला आहे,एकूण सीए समुदायामध्ये, महिलांचा आता 30% इतका वाटा झाला आहे, जो गेल्या काही वर्षांत झालेली उल्लेखनीय प्रगती दर्शवित आहे. याव्यतिरिक्त आता भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) च्या परीक्षेमध्ये विक्रमी 43% पात्रताधारक उमेदवार या महिला आहेत. ही वाढ 2000 मधील केवळ 8% असलेल्या प्रतिनिधीत्वावरून झालेली लक्षणीय प्रगती दर्शवते, ज्यामुळे या क्षेत्रात महिलांचे वाढते महत्त्व दृढ होत आहे.
महिला प्रतिभेचा प्रवाह हा केवळ सांख्यिकीय कल नसून लेखा आणि लेखापरीक्षण क्षेत्रातील बदलत्या गतीशीलतेचे प्रतिबिंब आहे.
आउटसोर्स्ड वित्तीय सेवांसाठी भारत हे एक पसंतीचे ठिकाण बनल्यामुळे, व्यावसायिकांसाठी नवीन मार्ग खुले होत आहेत. फ्रेशर्ससाठी आकर्षक वेतनाचे आकर्षण, सीए अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करण्याची लवचिकता यामुळे या क्षेत्रात करिअर करण्यासाठी महिलांना मोठी चालना मिळाली आहे.
अलीकडील परीक्षेच्या निकालांनी सीए डोमेनमध्ये महिलांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आहे. 2020 मध्ये, अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षांमध्ये सहा पैकी चार टॉपर्स या महिला होत्या, हा ट्रेंड त्या नंतर ही मध्ये जुन्या आणि नवीन अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये कायम राहिला. महिला उमेदवारांची सातत्यपूर्ण कामगिरी आणि समर्पण अधोरेखित करणारा हा कल त्यानंतरच्या वर्षांतही आश्वासक आहे. गेल्या दशकभरात, 75 महिलांनी विविध स्तरांवर सीए परीक्षेत सर्वोच्च स्थान मिळवले आहे.
महिला सीए यांची संख्या 2017 मध्ये 64,685 तसेच 2018 मध्ये 70,047 होती. तर 2019 मध्ये एकूण 2.91 लाख CA पैकी 73,807 महिला होत्या. मात्र 2023 मध्ये एकूण 3.9 लाख सीए मध्ये महिलांचे प्रमाण वाढून संख्या आता 1.2 लाख वर गेली आहे. तसेच 2023 मध्ये, एकूण 8.63 लाख इच्छुकांपैकी 43% महिला होत्या ज्यांची संख्या 2019 मध्ये 30% होती
भारतातील सर्वात कठीण व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी एक असलेल्या सीए क्षेत्रात महिलांची वाढती संख्या ही निश्चितच सकारात्मक गोष्ट असून देशाच्या गतिमान अर्थव्यवस्थेला पूरक ठरणारी आहे.