विवरण पत्रे न भरणारे आय कर विभागाच्या रडार वर -केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) कडून इशारा

GST 4 YOU
   
व्यवसाय करणारे, कर पात्र उत्पन्न असणारे  किंवा ज्याच्या मिळकती तून उद्गम कर कपात (टीडीएस) होते आहे असे कर दाते परंतु त्यांनी अद्याप आय कर विवरण पत्र भरलेले नाही, अशा करदात्यांना नोटीसा बजावल्या जाणार आहेत.
        सीबीडीटीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी टीडीएस कापला गेलेली व्यक्ती ही कर दाता आहे असे गृहीत धरण्यात येते. अशा व्यक्ती कडून  किमान कापला गेलेला कर परत मिळावा या साठी विवरण पत्र सादर करून त्याने वार्षिक उत्पन्न सरकारला दाखवणे अपेक्षित असते . मात्र टीडीएस कापून देखील त्याचा परतावे न घेणाऱ्या संख्या मोठी आहे.त्यांना त्याविषयी कारणे दाखवा नोटीसा दिल्या जाणार आहेत. असे विवरण पत्र न भरणाऱ्यांची संख्या सरकारी अंदाजानुसार दीड कोटी इतकी आहे .
    गेल्या काही वर्षात प्राप्तिकार भरणाऱ्याची संख्या वाढत असली तरी कापला गेलेला उद्गम कर व परतावा याची रक्कम ही एकमेकाशी जुळत नसल्याचे प्राप्ती कर विभागाच्या निदर्शनाला आले आहे . बऱ्याचदा विवरण पत्र भरताना काही तपशील राहून गेल्यास विभागास माहिती मध्ये विसंगती आढळून येते. त्याची पडताळणी करून आय कर विभागाने बराच मोठा करही गोळा केला आहे.