छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादना साठी जीएसटी अधिकारी धावले

GST 4 YOU

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जीएसटी विभाग आणि शिवजयंती उत्सव समिती यांच्या पुढाकाराने खास जीएसटी रन 2024 चे पुणे येथे आयोजन करण्यात आले होते. या रन मध्ये तब्बल 500 हून जास्त अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होऊन शिवरायांना अभिवादन केले .

या समारंभासाठी तसेच मॅरॅथॉन ला फ्लॅग दाखवण्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणुन एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार , पोलीस उपायुक्त आर. राजा, राज्य कर विभागाचे सह आयुक्त संजीव पाटील, उपायुक्त अमित शेंदारकर आदी मान्यवर उपस्थित होते .ही स्पर्धा पाच किलोमीटर व दहा किलोमीटर अशा दोन वर्गवारीत पडली.
 या स्पर्धेत वस्तू व सेवा कर विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच नातेवाईक व मित्रपरिवार उत्साहाने व मोठ्या संख्येने सहभागी होते.