जीएसटी नंतर आता आय कर विभागाचे नाशिकमध्ये सरकारी कंत्राटदारासह बांधकाम व्यावसायिकांवर छापे

GST 4 YOU
   
नाशिकमध्ये सरकारी कंत्राटदारासह बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागानं छापे टाकले आहेत. या कारवाईत आयकर विभागाचे सुमारे 120 अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाई  साठी बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास 70 वाहनांच्या ताफ्यासह आयकर विभागाचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले होते. त्यांनी एकाच वेळी 14 ठिकाणी छापे टाकले, तर 20 ते 25 ठिकाणी शोधमोहीम  करण्यात आली. या छाप्यात अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रं जप्त केल्याचे वृत्त असून अद्यापही कारवाई सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

 दीड महिन्यात दुसरा छापा : आयकर विभागाच्या पथकानं नाशिकच्या बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर नाशिक शहरात दीड महिन्यात टाकलेला हा दुसरा छापा आहे. आयकर विभागाच्या धाडीत शहरातील प्रख्यात बिल्डर्स रडारवर असून, त्यांची घरे, कार्यालये आयकर यांची अधिकाऱ्यांनी झडती घेऊन शोध मोहीम राबवली. अवघ्या दीड महिन्यांपूर्वी या बांधकाम व्यावसायिकांवर जीएसटी विभागानं कारवाई केली होती.