जीएसटी कर सवलती साठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने घेतलेल्या सेवा पात्र नाहीत -तेलंगणा अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरण यांचा निर्णय

GST 4 YOU

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या संस्थेने मनुष्यबळ, हाऊसकीपिंग आणि कन्सल्टन्सी यांच्याशी संबंधित असलेल्या प्युअर सेवांवर 18% जीएसटी ची सवलत मिळण्यासाठी तेलंगणा अग्रीम अधिनिर्णय प्राधिकरण यांचे कडे अधिनिर्णया साठी विनंती केली होती. AIIMS हे आरोग्य सेवा पुरवत असल्याने व त्या सेवा या कर पात्र नसल्याने त्यांनी घेतलेल्या सेवांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) घेऊ शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर  सदर सवलतीसाठी अर्ज केला होता.


AIIMS च्या म्हणण्या नुसार ती  केंद्र सरकारची एक संस्था असल्याने, अधिसूचना क्र.12/2017 - केंद्रीय कर (दर) नुसार अशा करांमधून सूट मिळण्यास पात्र आहे. 
मात्र  प्राधिकरणाने निष्कर्ष काढला की AIIMS ला 'केंद्र सरकार' म्हणून नाही, तर संसदेच्या कायद्यानुसार स्थापित 'सरकारी प्राधिकरण' म्हणून ओळखले जाते.

1 जानेवारी 2022 रोजी अधिसूचना 12/ 2017 मध्ये झालेल्या सुधारणानंतर, 'सरकारी प्राधिकरण' हा शब्द वगळण्यात आल्याने, AIIMS हे सवलतीसाठी पात्र नसल्याचे आढळले.
बऱ्याचदा अनेक रुग्णालये, वैद्यकीय महविद्यालये, प्रतिष्ठाने यांच्यात मनुष्यबळ, हाऊस कीपिंग आणि कन्सल्टन्सी या सेवां वरील कर देयते बद्दलचा असलेला संदेह या निर्णया मुळे कमी होईल .