देशात रू.1 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवणारे किती लोक आहेत - सरकारने दिली संसदेत माहिती

GST 4 YOU


देशात रू. 1 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवणारे व्यक्तींची संख्या वाढत असून ती आता 2.16 लाखांवर पोहोचली आहे.
   निर्धारणा वर्ष 2023-24 साठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत वार्षिक 1 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या 2.16 लाखांहून अधिक झाली आहे, अशी माहिती मंगळवारी संसदेत देण्यात आली.
   वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आयकर विवरण पत्र सादर करणाऱ्या 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या   व्यक्तींच्या संख्येचे निर्धारणा वर्षा नुसार तपशील दिले.
      निर्धारणा वर्ष 2019-20 मध्ये 1.09 लाख असलेल्या व्यक्तींची संख्या वाढून निर्धारण वर्ष 2022-23 मध्ये ती सुमारे 1.87 लाखांपर्यंत गेली .तर आता निर्धारण वर्ष  2023-24 साठी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या आणि  31 डिसेंबर 2023 पर्यंत आयकर विवरण पत्र दाखल केलेल्या व्यक्तींची  संख्या 2.16 लाख झाली आहे.
     चौधरी पुढे म्हणाले की निर्धारण वर्ष  2023-24 मध्ये *प्रोफेशन'* मधून उत्पन्नाची नोंद करणाऱ्या एकूण वैयक्तिक करदात्यांची संख्या 12,218 आहे, जी वर्ष 2022-23  मध्ये असलेल्या 10,528 संख्ये पेक्षा जास्त आहे.तर 2019-20 मध्ये, अशा लोकांची संख्या 6,555 होती.