वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) च्या चुकवे गिरी च्या संशया वरून रिटेल चेन क्षेत्रातील बड्या व्यावसायिकावर महत्त्वपूर्ण कारवाई करताना, तेलंगणा राज्य कर (कमर्शिअल टॅक्सेस) विभागाने बुधवारी रात्री हैद्राबाद शहरातील आणि राज्यभरातील अनेक दुकानांवर छापे टाकले. छाप्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात 100 कोटींहून अधिक रकमेची चोरी उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादसह राज्यभरात 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. शंभराहून जास्त अधिकाऱ्यानी भाग घेतलेल्या या कारवाईत शहरातील साखळीच्या सात पेक्षा जास्त दुकानांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात त्यांचे गाचीबावली येथील मुख्यालय आणि स्टॉक सेंटर आदींचा समावेश आहे.
विभागास मिळालेल्या टीप नंतर केलेल्या कारवाई दरम्यान तपासणीत खरेदी आणि विक्री किंमतींच्या 100% ते 400% पर्यंतचे फरक आढळून आले तसेच त्यावर कोणतेही कर भरले नसल्याचे आढळले.
अधिकारी आता नमूद खरेदी किमतींच्या अचूकतेचे परीक्षण करत आहेत आणि त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट बद्दलही गंभीर विसंगती असल्याचा संशय आहे,” सूत्राने सांगितले.