इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे नोव्हेंबर २०२३ मध्ये आयोजित सीए अंतिम आणि इंटरमिजिएट परीक्षांचे निकाल जाहीर केल्यानंतर, ICAI ने अंतिम परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. जयपूर येथील मधुर जैन याने सीए फायनल परीक्षेत ७७.३८% गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आहे.
दरम्यान, सीए फायनलचा दुसरा क्रमांक मुंबईच्या संस्कृती अतुल पारोलियाने (७४.८८%) तर जयपूर येथील टिकेंद्र कुमार सिंघल आणि ऋषी मल्होत्रा यांनी तिसरा क्रमांक (७३.७५%) सामायिक रीत्या पटकविला.
सीए इंटरमिजिएट परीक्षेत, मुंबईचा जय देवांग जिमुलिया ८६.३८% गुणांसह अव्वल, त्यानंतर भगेरिया तनय (अहमदाबाद) ८६% आणि ऋषी हिमांशूकुमार मेवावाला (सूरत) यांनी ८३.५०% गुणांसह अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवला.
या बाबतचे प्रेस रिलिज ICAI ने प्रसिध्द केले आहे.
https://resource.cdn.icai.org/78430prc62785.pdf