एका बड्या कंपनीच्या गोव्यातील पाच ते सात आस्थापनांवर एकाचवेळी आय कर विभागा कडून धाडी टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
गोव्यात नाताळ, नववर्षाची धामधूम संपताच आयकर अधिकाऱ्यानी किनारी भागांमध्ये हॉटेल्स, पब्स आणि रेस्टॉरंटसवर छापा सत्र सुरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरुहून आयकर अधिकार्याची पथके दाखल झाली असून एका बड्या कंपनीच्या गोव्यातील पाच ते सात आस्थापनांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या.
नाताळ, नववर्षानिमित्त गोव्यात किनाऱ्यावरील पब्स, हॉटेल्स, रेस्टॉरण्टसमध्ये मोठी गर्दी असते.अशा काही आस्थापनांचे मालक आयकर चुकवत असावेत, असा संशय आयकर खात्याला असून या पार्श्वभूमीवरच या धाडी टाकल्याचा जाणकारांचा कयास आहे.