अबब ..आणखीन एक जीएसटी घोटाळा...आता ठेकेदारांकडून

GST 4 YOU


अबब...
 आणखीन एक जीएसटी घोटाळा...आता ठेकेदारांकडून

केंद्रीय जीएसटी पथकाने मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत एका मोठया कारवाईत 200 हून अधिक कंत्राटदारांनी मिळून जवळपास 40 ते 50 कोटींचा कर चुकवला असल्याची माहिती समोर आणली आहे. बोगस कंपन्यांच्या बिलांद्वारे हा घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 

    कादर या व्यक्तीच्या नावाने असलेल्या  बोगस कंपनीचा वापर कर चुकवण्यासाठी करण्यात आला होता.

   जीएसटी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 200 ते 250 कोटी रुपयांची बोगस बिलासाठी सिमेंट विक्रीच्या 9 कंपन्या स्थापन केल्या गेल्या. जवळपास 200 हून अधिक ठेकेदारांनी या कंपनीची बिले घेतली. कागदावरील कंपनीचा मालक असलेल्या कादरला अटक करण्यात आली आहे. त्याच्या बोगस कंपन्यातून कंत्राटदारांनी बिले दाखवली आहेत. 

    या घोटाळ्यातून 40 ते 50 कोटींचा जीएसटी  बुडवण्यात आल्याचा वहीम आहे. बिले घेणाऱ्या कंत्राटदारांचा शोध सुरू आहे. या घोटाळ्यात काही बड्या कर सल्लगार यांचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्यात मराठवाड्यातील अनेक  जिल्ह्यातील 200 कंत्राटदारांचा या घोटाळ्यात समावेश आहे.
बिले घेणाऱ्या कंत्राटदारांकडे रस्ते बांधकाम, पाणी पुरवाठ्याशी संबंधित बांधकाम आदी प्रकारच्या कामांची कंत्राटे होती. त्यामुळे आता या कंत्राटदारांनी किती दर्जेदार कामे केली आहेत, याबद्दल ही चर्चा सुरू झाली आहे.