बनावट जीएसटी बिले तयार करून कोट्यवधीची कर चोरी -लाकूड व्यावसायिकावर मोठी कारवाई

GST 4 YOU


बनावट जीएसटी बिले तयार करून कोट्यवधीचा जीएसटी चोरी प्रकरणी लाकूड व्यावसायिकावर मोठी कारवाई*

      बनावट बिले प्रकरणी महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागाने एका लाकूड व्यावसायिकावर मोठी कारवाई केली.

       सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथील विनोद टिंबर येथे राज्य जीएसटीने ही कारवाई केली.

    सरकारने सर्व राज्यांच्या जीएसटी विभागांना बनावट जीएसटी बिले आणि आयटीसी बनवणाऱ्यांची ओळख पटविण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमे अंतर्गत सापडलेल्या कसूरदारांवर कारवाई केली जात आहे.

   त्या अनुषंगाने सदर लाकूड व्यावसायिकावर बनावट चलनासह जीएसटीची चोरी केल्याप्रकरणी ही कारवाई केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

         मागील वर्षी उत्तराखंड राज्य जीएसटी विभागाने डिजीटल ट्रॅकिंग, फॉरेन्सिक ऑडिट आणि इलेक्ट्रॉनिक पाळत यांचा वापर करून शोध आणि जप्तीच्या ऑपरेशनमध्ये, उधम सिंह नगर जिल्ह्यातील संशयास्पद लाकूड व्यापाऱ्यांचे एक मोठे संघटित रॅकेट उघडकीस आणले होते.