गुजरातहून बनावट बिलाआधारे पाठवलेले भंगार स्टील कंपन्यांनी घेतल्याचे संशयावरून केंद्रीय जीएसटीचे पथक तीन दिवसांपासून जालन्यात चौकशीसाठी ठाण मांडून आहे.
बुधवारी दोन कंपन्यांमध्ये पथकाने छापे टाकले. तर त्या दिवशी सायंकाळी छत्रपती संभाजीनगर रोडवरील एका कंपनीत भंगाराची वाहने, वजनकाटा सील केला. रात्री उशिरापर्यंत पथकांकडून तपासणी सुरू होती.
त्या आधी सुटीच्या दिवस असूनही रविवारी जालना एमआयडीसीत संभाजीनगर महामार्गापासून जवळ एका बड्या स्टील कंपनीत छापा टाकला. तब्बल २१ तास ही कारवाई सुरू होती. मंगळवारी पुन्हा जालन्यात येऊन चाचपणी केली. तर बुधवारी रेकॉर्ड जप्त केले
दरम्यान, अधिकारी रेकॉर्ड घेऊन गेलेले असल्यामुळे त्यांच्या तपासणीतून काय बाहेर येते याची उत्सुकता आहे