मा. अलाहाबाद उच्च न्यायालया ने ई -वे बिलातील टायपोग्राफिकल चुकी मुळे दिलेले दंड आकारण्याचे आदेश केले रद्द

GST 4 YOU
 
मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदुस्थान हर्बल कॉस्मेटिक्स विरुद्ध यूपी राज्य [रिट कर क्रमांक 1400 / 2019 ] या केस मध्ये रिट याचिकेला परवानगी देताना ई वे बिलातील टायपोग्राफिकल चुकीच्या आधारावर दंड आकारण्याचे जीएसटी विभागाचे आदेश रद्द केले. 
परिपत्रक क्र. 41/15/2018 दि. 13 एप्रिल,2018 आणि क्र. 49/ 23/2018 दि. 21 जून 2018 नुसार परवानगी दिलेल्या दोन अंकांऐवजी ई-वे बिला मध्ये तीन अंकी चुकीचा वाहन क्रमांक  प्रविष्ट केल्याची त्रुटी ही किरकोळ स्वरूपाची  आहे आणि म्हणून दंड आकारणे हे अधिकार क्षेत्राशिवाय आणि कायद्याने बेकायदेशीर आहे असे मत न्यायालयाने नोंदवले.
 मा. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सहाय्यक आयुक्त ,एसटी आणि इतर वि. सत्यम शिवम पेपर्स प्रा. लि. [एसएलपी (सी) क्रमांक 21132/2021] आणि मा. अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल वरुण बेव्हरेजेस लिमिटेड वि. युपी राज्य आणि इतर [रिट कर क्रमांक 958/2019 याचा आधार घेत मा. उच्च न्यायालयाने नमूद केले की, दंड आकारण्यासाठी ,कर चुकविगिरी केली हे  ठरवण्यासाठी मेन्स रिया ची प्राथमिक आवश्यकता आहे. तसेच, ई-वे बिलामध्ये कर चुकवण्याच्या हेतू सिद्ध होण्यासाठी कोणत्याही पुराव्या शिवाय केवळ टायपोग्राफिकल त्रुटीमुळे दंड आकारला जाऊ शकत नाही.