मे.इव्हरीडे बँकिंग आणि रिटेल असेटस वि. सहायक आयुक्त (एसटी) कार्यालय या प्रकरणात याचिका कर्ता असलेल्या कर दात्याला 2017-18 ते 2020-21 या मूल्यांकन वर्षांच्या संदर्भात व्याज भरणा करण्या बद्दल कर विभागाने सूचना जारी केली होती. याचिकाकर्त्याने सर्व कर देय रक्कम भरली होती, परंतु कोविड-19 महामारीच्या काळात याचिकाकर्त्याच्या व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे व्याज प्रलंबित राहिले ते भरण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी त्याने याचिकेत केली होती .
याचिकाकर्त्याने सर्व कर भरणा पूर्ण केला आहे याचा विचार करून मा. मद्रास उच्च न्यायालयाने, याचिकाकर्त्याला तीन मासिक हप्त्यांमध्ये विभागानं मागणी केलेल्या व्याजाची रक्कम भरण्याचे निर्देश दिले .