तब्बल १५ कोटींचा व्हॅट चुकवेगिरी प्रकरणी सांगली राज्य जीएसटी विभागांकडून तक्रारी नंतर दोघांवर गुन्हा दाखल

GST 4 YOU

सात वर्षाच्या कालावधीत तब्बल रू. १५.१२ कोटीचा व्हॅट चुकवल्याबद्दल महालक्ष्मी डिस्ट्रीब्यूटर्स, सांगली  यांच्यावर राज्य कर विभागाने कुपवाड पोलिसात तक्रार नोंदवली.यानंतर लड्डा पिता पुत्र या दोघांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे.

      या फर्मचा गरम मसाले, प्लास्टिक ग्रॅनुल व इलेक्ट्रिक वस्तू यांचा व्यवसाय आहे.

   संबंधितांनी एप्रिल २००७ पासून मार्च २०१४ पर्यंत एकूण व्हॅट (मूल्यवर्धित कर), व्याज व त्यावरील  दंड असे एकूण १५ कोटी १२ लाख ५३ हजार ९६३ रुपयाची रक्कमेचा भरणा चुकवला.
   कोल्हापूर च्या राज्य कर सह आयुक्त सुनिता थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  उपायुक्त सचिन जोशी ,उपायुक्त सुनील कानगुडे,निरीक्षक वैभव माने, निरीक्षक शिवराज भोईटे यांच्या पथकाने याची पडताळणी केली असता कर चूकवेगिरीचा प्रकार आढळून आला.या प्रकरणी संबंधितांना विचारणा केली, नोटिसा बजावल्या परंतु काही प्रतिसाद न मिळालेने दीर्घ प्रतिक्षे नंतर या लड्डा पिता पुत्राविरुद्ध कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.