जीएसटी कर नोटिसांचा महापुर आला आहे का? नोटिसांमध्ये अचानक वाढीचे कारण काय?

GST 4 YOU

जीएसटी कर नोटिसांचा महापुर आला आहे का? नोटिसांमध्ये अचानक वाढीचे कारण काय?
 
  सध्या जीएसटी नोटिसांमध्ये वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत. बड्या विमा कंपन्या, एफएमसीजी  कंपन्या आदीना कारणे दाखवा नोटीसा आल्याचे वृत्त आले आहे. नोटिसांमध्ये अचानक वाढ होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे जीएसटी कायद्यानुसार आदेश जारी करण्यासाठी असलेली वेळेची मर्यादा. 
वेग वेगळी कारणे तसेच 2020 मध्ये आलेल्या साथीच्या आजारामुळे 2017-18 या वर्षा करीता कारणे दाखवा नोटीसा जारी करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती . त्या अंतिम तारखे पूर्वी अनेक कारणे दाखवा नोटीस (SCN) जारी करण्यात आल्या होत्या. तर त्याचे आदेश जारी करण्याची  मुदत 31 डिसेंबर 2023 पर्यंत होती. त्या अंतिम तारखे पूर्वी संबन्धित आदेश ही जारी करण्यात आले . तसेच 2018-19 या वर्षा करीता कारणे दाखवा नोटीसा जारी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2023  होती, ती 31 जानेवारी 2024 पर्यंत वाढवली आहे तर त्याचे आदेश जारी करण्याची  मुदत 30 एप्रिल  2024 आहे. 
या कारणा बरोबरच जीएसटी नोटिसांच्या  अधिक संख्येला  तंत्रज्ञानाचा वापर ही कारणीभूत आहे . जीएसटी विभागाने स्वयंचलित विवरण पत्र छाननी मॉड्यूल बॅकएंड ऍप्लिकेशनमध्ये विकसित  केले आहे. यातून उपलब्ध डेटा विश्लेषणाचा उपयोग जीएसटी विवरण पत्र मधील विसंगती आणि जोखीम ओळखून  परिणामी, अशा वैधानिक विवरण पत्र  मधील विसंगती साठी  करदात्याला सिस्टम-जनरेटेड छाननी नोटीसा जारी केल्या  जातात. मोठ्या संख्येने सूचना जारी करण्यासाठी कर अधिकारी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
यामुळे जीएसटी कर नोटिसांचा महापुर आला आहे असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.