पाच लाखाहून आधिक उपहार गृह व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने ( NRAI) सरकारला रेस्टॉरंट सेवेत आयटीसी सह जीएसटी दर १२% पर्यंत वाढवण्याची विनंती केली आहे. जीएसटी दर वाढवण्या बद्दल सरकारला लिहिलेल्या पत्रात, NRAI ने रेस्टॉरंट उद्योगात सुधारणा साठी हे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
असोसिएशनने असा युक्तिवाद केला की सध्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या निर्बंधांसह सध्या ५% GST दराने कार्यरत असलेल्या रेस्टॉरंट्ससाठी हा बदल ,विशेषत: लहान उद्योगांसाठी, फायदेशीर ठरेल. आयटीसी वापरा वरील निर्बंधांमुळे केवळ व्यवसायातील नफ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत नाही तर नवीन प्रकल्पासाठी भांडवली गरज देखील वाढते. या आयटीसी अभावी वाढलेल्या प्रकल्पाच्या खर्चामुळे विस्तार योजना मंदावतात, ज्यामुळे क्षेत्राच्या एकूण वाढीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.
त्यामुळे सरकारने आगामी अर्थ संकल्पात याचा विचार करावा असे हॉटेल व्यवसायिकांचे म्हणणे आहे.