देशातील अप्रत्यक्ष कर क्षेत्रात क्षमता निर्मितीसाठी च्या सर्वोच्च संस्थेचे आज मा.पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

GST 4 YOU
   
आज 16 जानेवारी 2024 रोजी, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील पलासमुद्रम येथे नशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स,  इन डायरेक्ट टॅक्सेस अँडनार्कोटिक्स (NACIN) चे अनावरण करणार आहेत.  500 एकर नयनरम्य परिसरातील हे विस्तीर्ण व नावीन्यपूर्ण केंद्र आधुनिक प्रशिक्षण व क्षमता विकासाच्या दिशेने अभूतपूर्व पाऊल ठरेल.


NACIN ची ठळक वैशिष्ट्ये
1. अप्रत्यक्ष कर क्षेत्रात क्षमता निर्माण करण्यासाठी भारत सरकारची सर्वोच्च संस्था
2. सीमाशुल्क, जीएसटी, केंद्रीय उत्पादन शुल्क, ड्रग्स कायदे, मनी लॉन्ड्रिंग विरोधी, बनावट भारतीय चलनी नोटा , आयपीआर या क्षेत्रातील प्रशिक्षण.
3. केंद्रीय महसूल तसेच केंद्रीय सहयोगी सेवा, राज्य सरकारे आणि सहभागी राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण 4. आंध्र प्रदेशातील श्री सत्य साई जिल्ह्यात 500 एकरमध्ये पसरलेला पर्यावरण अनुकूल हरित परिसर
5. ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी, ब्लॉक-चेन सह आर्टिफिशियल इंटेलिजेंस चा वापर करून सखोल प्रशिक्षण
6. डब्ल्यूसीओ, यूएनईपी, यूएनओडीसी आणि एसएएसईसी द्वारे मान्यताप्राप्त अकादमी
7. लोकांसाठी परिसरात पोस्ट ऑफिस, बँक, सुपरमार्केट, शाळा, हॉस्पिटल इत्यादी सुविधा.
8. स्थानिक लोकांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणावर आणि आसपासच्या परिसराच्या विकासावर भर.