उत्पादनांच्या कमाल किरकोळ किंमत (MRP) मध्ये जीएसटी अंतर्भूत... कराची वेगळी आकारणी करता येणार नाही

GST 4 YOU

उत्पादनांच्या कमाल किरकोळ किंमत (MRP) मध्ये जीएसटी अंतर्भूत... कराची वेगळी आकारणी करता येणार नाही

उत्पादनांच्या कमाल किरकोळ किमतीत (MRP) वस्तू आणि सेवा कर (GST) समाविष्ट आहे. त्यामुळें ग्राहकांनी एमआरपी पेक्षा ज्यास्त कोणतीही अतिरिक्त रक्कम देऊ नये असे सरकार तर्फे स्पष्ट करण्यात आले.
नियमांनुसार प्री-पॅकेज केलेल्या वस्तूची कमाल किरकोळ किंमत जीएसटीसह सर्व लागू करांसह असते. ग्राहक व्यवहार विभागाने सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या कायदेशीर मेट्रोलॉजी नियंत्रकांना सदर नियमांच्या तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी फील्ड वरील कर्मचार्‍यांना निर्देश द्यावेत असा सल्ला दिला आहे.