किती विलंब शुल्क आकारले जाते आज अंतिम मुदत असलेल्या जीएसटीआर वार्षिक विवरण पत्र फॉर्म GSTR-9 आणि GSTR-9C उशीरा भरल्यास ?.

GST 4 YOU

जीएसटीआर वार्षिक विवरण पत्र फॉर्म GSTR-9 आणि GSTR-9C उशीरा भरल्यास किती विलंब शुल्क आकारले जाते?: आज ३१ डिसेंबर आहे अंतिम मुदत ....

आज ३१ डिसेंबर अंतिम मुदत असलेल्या जीएसटीआर वार्षिक विवरण पत्र फॉर्म GSTR-9 आणि GSTR-9C उशीरा भरल्यास साठी विलंब शुल्क पुढील प्रमाणे आकारले जाते

फॉर्म GSTR-9 साठी : उशीरा प्रत्येक दिवशी 200 रुपये (CGST आणि SGST साठी प्रत्येकी INR 100) मात्र विशिष्ट राज्य / केंद्रशासित प्रदेशातील एकूण उलाढालीच्या 0.5% च्या कमाल मर्यादेच्या अधीन आहेत.

फॉर्म GSTR-9C साठी : कोणतीही विशिष्ट तरतूद नाही; म्हणून, जीएसटी कायदा, 2017 कलम 125 अंतर्गत सर्वसाधारण दंड रू. 50,000 (CGST आणि SGST साठी प्रत्येकी रू.25,000) आहे.
यासाठी सरकारने दोन कोटी हून अधिक वार्षिक एकूण उलाढाल असणाऱ्या कर दात्याना फॉर्म 9 तर पाच कोटी हून अधिक वार्षिक एकूण उलाढाल असणाऱ्या कर दात्याना फॉर्म 9C वेळेत भरण्याचे आवाहन केले आहे.