पुण्या नंतर आता आयकर विभागाचे बांधकाम व्यावसायिकांवर छत्रपती संभाजी नगर येथे छापे - २५० हून अधिक अधिकारी कारवाईत सहभागी

GST 4 YOU

पुण्या नंतर आता आयकर विभागाचे  बांधकाम व्यावसायिकांवर छत्रपती संभाजी नगर येथे छापे - २५० हून अधिक अधिकारी कारवाईत सहभागी

पुण्या नंतर आता आयकर विभागाने बड्या बांधकाम व्यावसायिकांवर छत्रपती संभाजी नगर येथे एकूण २० ठिकाणी छापे टाकले असून २५० हून अधिक अधिकारी कारवाईत सहभागी आहेत.

छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाने छापेमारीला सुरुवात केलेली आहे. शहरातील अनेक बड्या व्यावसायिकांच्या कार्यालयामध्ये आणि घरावर ही छापेमारी सुरु आहे.

कर चुकवल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं बोललं जात असून अद्याप त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.

प्राप्तिकर विभागाने नुकतीच पुणे पिंपरी चिंचवड येथे अशी कारवाई केली होती.