स्थावर मालमत्ता संबंधीत व्यवहार एजंटा मार्फत करत आहात? .. .. एजंटा कडे रेरा चे प्रमाणपत्र आहे याची खात्री करा..

GST 4 YOU

स्थावर मालमत्ता संबंधीत व्यवहार एजंटा मार्फत करत आहात? .. .. एजंटा कडे रेरा चे प्रमाणपत्र आहे  याची खात्री करा.. 

घर विकणार आणि खरेदी करणार यामध्ये दुवा म्हणून असलेले रिअल इस्टेट एजंट याना  महारेरा म्हणजे महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण यांनी सक्षमता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक केले आहे. प्रमाणपत्राशिवाय खरेदी विक्रीचा व्यवसाय केल्यास महारेरा कडून कारवाई होऊ शकते.
    बिल्डरांच्या व्यवसायासाठी नियंत्रक म्हणुन सरकारने रेरा कायदा  आणला. सदनिका, भूखंड, इमारत किंवा स्थावर संपदा प्रकल्पांच्या विक्री प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता, परिणामकारकता यांची खात्री करून स्थावर संपदा क्षेत्रातील ग्राहकांचे हित जपणे, तक्रारींचे जलद निवारण करणे यासाठी महारेरा स्थापन करण्यात आले आहे.

यानुसार व्यवहारात मध्यस्थी करणाऱ्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
हे प्रमाण पत्र प्राप्त करण्यासाठी आता थेट ग्राहकांशी संपर्कात असणाऱ्या एजंटना प्रशिक्षण देण्यात येत आहे .जेणेकरून ग्राहकांना प्रकल्प व विकसका बद्दल योग्य माहिती देऊन ग्राहकांना योग्य मार्गदर्शन मिळून फसवणूक टाळण्यात येऊ शकते. तसेच  त्यामुळे एजंटांच्या कार्यपद्धती सुसंगत होऊन आणि त्यांना खरेदी विक्रीच्या व्यवहारासंबंधी संपूर्ण कायदेशीर माहिती असायला हवी या उद्देशाने शासनाने हे पाऊल उचलले आहे.

 महारेरा ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय अशा एजंटना मालमत्तेची विक्री करताना मध्यस्थी करता येणार नाही . याचे पालन न झाल्यास कारवाई ची तरतूद आहे

  तसेच योग्य कमिशन संबंधी काही  वाद  निर्माण झाल्यास याचा एजंटा ना ही फायदा होऊ शकेल.