घोटाळे बाजांपासून सावध राहण्याचा जीएसटी परिषदेचा सल्ला

GST 4 YOU

घोटाळे बाजांपासून सावध राहण्याचा जीएसटी परिषदेचा सल्ला

जीएसटी पेमेंटसह ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या वाढली आहे. स्कॅमर  फोन कॉल, एसएमएस आणि मेलद्वारे जीएसटी पेमेंटसाठी चलन डाउनलोड करण्यास सांगत असतात. तथापि, व्यावसायिकानी डाउनलोड लिंकवर क्लिक करताच, त्याच्या बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतले जाऊ शकतात. अशा फसवणुकी विरुद्ध इशारा देऊन, जीएसटी परिषद, जीएसटी नेटवर्क आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, तसेच राज्य कर विभाग कर दात्याना नियमितपणे सतर्क करत असतात. अशा घोटाळ्यांबाबत व्यावसायिकांना सतर्क करण्यासाठी नुकताच एक इशारा देण्यात आला.

 फसवणुक कशी होते 

जर तुम्ही जीएसटी कर दाते असाल, तर तुम्हाला जीएसटी विभागाकडून तुमच्या खात्यातून जीएसटी कापला गेला आहे आणि तुम्ही चलन डाउनलोड करण्यासाठी ईमेलमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले पाहिजे असा ईमेल प्राप्त होऊ शकतो . मात्र, जीएसटी परिषद कधीही फोन कॉल, संदेश किंवा मेलद्वारे जीएसटी पेमेंटची विनंती करत नाही. अशा बनावट कॉल्स, मेसेज किंवा ईमेलच्या आधारे  कोणत्याही बँक खात्यात पैसे जमा करू नयेत असा सल्ला दिला आहे. 
अशी फसवणूक  घडल्यास जीएसटी परिषद जबाबदार राहणार नाही. असे आढळल्यास  पोलिसांकडे तत्काळ तक्रार करण्याचा सल्ला परिषदेने दिला आहे.