जीएसटी, आयकर नियम अनुकूल असे रेरा पोर्टल “या” राज्या कडून कार्यान्वित

GST 4 YOU

जीएसटी, आयकर नियम अनुकूल असे रेरा पोर्टल “या” राज्या कडून कार्यान्वित
जीएसटी, आयकर नियमांचे पालन करण्यास अनुकूल असे रेरा पोर्टल (RERA 2.0) गुजरात मध्ये नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. गुजरात रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (गुजरेरा) ने रेरा कायदा आणि नियमांच्या तरतुदीं वर आधारित या पोर्टल द्वारे आयकर आणि जीएसटी विभागांना प्रकल्पाच्या टप्प्याबद्दल अचूक माहिती भविष्यात मिळू शकेल.

पूर्वी, काही विकसक, त्यांच्या नफा व कर दायित्वाचे व्यवस्थापन करण्याच्या हेतूने त्रैमासिक प्रगती अहवाल (QPR) मध्ये कालबाह्य छायाचित्रे सादर करून कर अधिकाऱ्यांना प्रकल्प प्रगती बद्दल माहिती पुरवायचे. तथापि, नवीन पोर्टलने विकसकांना प्रकल्पाच्या जागेचे रिअल-टाइम फोटो सादर करणे बंधनकारक केले आहे . आता  कर अधिकार्याना अचूक तपशील उपलब्ध होऊ शकेल.

सूत्रानी सांगितले की, “रेरा (रेरा 1.0) च्या मागील आवृत्तीमध्ये, त्रैमासिक प्रगती अहवाल भरताना जुनी  छायाचित्रे अपलोड  केल्याने  प्रकल्प पूर्ण झाल्याचा चुकीचा अहवाल येऊ शकत होता. या चुकीच्या अहवालामुळे, अंशतः प्रकल्प पूर्ण किंवा प्रकल्पाच्या पूर्णत्व यावर आधारित आयकर आणि जीएसटी कर आकारणी वर परिणामाची शक्यता होती . रेरा 2.0  मुळे हे थांबेल कारण या नवीन पोर्टलने थेट प्रकल्प फोटों रिअल-टाइम पद्धतीने अदयावत करणे अनिवार्य केले आहे.
  तज्ञानी सांगितले की रिअल इस्टेट डेव्हलपर्सनी या नवीन पोर्टलशी जुळवून घेणे आवश्यक आहे कारण   प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेले या नवीन पोर्टल वर विकसकाना प्रकल्पा च्या प्रत्यक्ष प्रगतीचा  अचूक  अहवाल देणे बंधन कारक आहे .

भविष्यात, आयकर आणि जीएसटी दोन्ही विभागांना विकसकांनी त्यांच्या तिमाही प्रगती अहवालात नमूद माहिती सहज रित्या मिळू शकेल.