आयकर विभागा कडून पुणे, मुंबई आदी ठिकाणी इलेक्ट्रिकल वस्तू निर्मिती क्षेत्रातील बड्या कंपनीवर छापे

GST 4 YOU

आयकर विभागा कडून पुणे, मुंबई आदी ठिकाणी इलेक्ट्रिकल वस्तू निर्मिती क्षेत्रातील बड्या कंपनीवर छापे

वायर, पंखे आणि दिवे तयार करणाऱ्या बड्या कंपनीवर आयकर विभागाने काल पासून छापेमारी सुरू केली आहे.

 देशभरातील ५० हून अधिक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. माहितीनुसार, कंपनी व्यवस्थापनाच्या कार्यालयांची आणि घरांचीही झडती घेण्यात येत आहे. 

सदर कंपनी इलेक्ट्रिकल वस्तू म्हणजेच घरात वापरल्या जाणाऱ्या विजेशी संबंधित वस्तू बनवते. कंपनी इलेक्ट्रिकल वायर, कंट्रोल केबल्स, पॉवर केबल्स, बिल्डिंग वायर्स, इंस्ट्रुमेंटेशन केबल्स, पंखे तसेच दिवे तयार करते. 

 माहितीनुसार, मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, बडोदा, सिकंदराबाद आणि कोलकाता येथील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. कंपनीच्या गोदामावर आणि उत्पादन सुविधांवरही छापे टाकण्यात आले आहेत. कंपनीने कमी नफा दाखवण्यासाठी त्याच्या उत्पादन सुविधांवर खर्च वाढविला आणि कर दायित्व कमी करण्यासाठी  चुकीचे दावे सादर केले