नमकिन , मिठाई, फरसाण, खारा माल यावरील जीएसटी दरांच्या वर्गीकरणातील संदिग्धते मुळे व्यावसायिक गोंधळात?
काही व्यावसायिकांना जीएसटी नोटीसा आल्यानंतर स्नॅक्स उद्योगास आता सरकारकडून नमकीन, फ्रायम्स ,फरसाण आदी स्नॅक्सच्या वर्गीकरण स्थितीबद्दल आधिक स्पष्टता अपेक्षित आहे.
नुकत्याच या उद्योगावर १८% जीएसटी दराने नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी या उद्योजकांचे मत आहे की नमकीन आणि संबंधित स्नॅक्सवर एचएसएन कोड २१०६ अंतर्गत १२ % दराने जीएसटी लागू आहे.
तथापि, सूत्रांचे म्हणणे आहे की विभागाच्या मते निवडक नमकीन जसे की चिप्स १२ % जीएसटी आहे आणि इतर नमकीन आणि स्नॅक्स ,जे फ्रायम्स किंवा स्नॅक्स म्हणून मानले जातात आणि एक्सट्रूझन प्रक्रियेतून तयार होतात त्यास १८% जीएसटी लागू आहे. या श्रेणी तील निवडक उत्पादन निर्मिती साठी एक्सट्रूझन प्रक्रिया असल्याने , अशा प्रकारांवर १८% वर कर लागला पाहिजे.
जीएसटी वर्गीकरणाबाबतची चर्चा ही सरकार आणि उद्योग या दोघांसाठीही एक प्रश्न आहे. सीबीआयसी च्या जानेवारी २०२३ च्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की एक्सट्रूझन प्रक्रियेनंतर बनवलेल्या फ्रायम्स, पेलेट्स इत्यादी सारख्या पदार्थांचे वर्गीकरण एचएसएनकोड १९०५ अंतर्गत केले जाईल आणि त्यावर १८% जीएसटी लागू होईल. https://www.cnbctv18.com/economy/gst-classification-conundrum-continues-industry-seeks-gst-clarity-on-namkeen-snacks-after-facing-dggi-notices-18161741.htm