आपली वार्षिक एकूण उलाढाल रू दोन कोटी पेक्षा जास्त आहे काय?...तर जीएसटी वार्षिक विवरण पत्र मुदतीत भरण्याचे सरकारचे आवाहन

GST 4 YOU

आपली वार्षिक एकूण उलाढाल रू दोन कोटी पेक्षा जास्त आहे काय?...तर जीएसटी वार्षिक विवरण पत्र मुदतीत भरण्याचे सरकारचे आवाहन 


ज्या कर दात्यांची २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक एकूण उलाढाल ही रू.२ कोटी पेक्षा जास्त आहे अशांनी या आर्थिक वर्षाचे जीएसटी वार्षिक विवरण पत्र फॉर्म GSTR -9  मध्ये ३१ डिसेंबर २०२३ पर्यन्त भरणे आवश्यक आहे.

तसेच ज्या कर दात्यांची २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक एकूण उलाढाल ही रू.५ कोटी पेक्षा जास्त आहे अशांनी फॉर्म GSTR -9  बरोबर जीएसटी स्व-प्रमाणित  रिकन्सीलिशन प्रपत्र फॉर्म GSTR -9C   सुद्धा ३१ डिसेंबर २०२३ पर्यन्त भरणे आवश्यक आहे.

मात्र इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर , टीसीएस/ टीडीएस डीडक्टर , कॅज्यूअल टॅक्सेबल पर्सन, अनिवासी करपात्र व्यक्ती आदीना यातुन वगळले आहे.

GSTR -9 फॉर्म किंवा जीएसटी स्व-प्रमाणित रिकन्सीलिशन GSTR -9C फॉर्म विहित मुदतीत न भरल्यास  विलंब शुल्क आकारले जाते.