अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबईतील फसवणूक आणि धोकाधड़ी प्रकरणात बड़ा साड़ी व्यापारी, त्याचा चार्टर्ड अकाउंटंट आणि इतरांच्या चौकशी करून पाच ठिकाणी छापे टाकले.
मध्य मुंबईतील साडी व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेला सदर व्यापारी ,लोकप्रिय साडी शोरूम देखील चालवतो. या शोरूम वरही एजन्सीने छापा टाकला.
सूत्रांनी या घडामोडीची पुष्टी करताना सांगितले की ऑगस्ट 2019 मध्ये एका डेव्हलपर ची फसवणूक केल्याबद्दल सदर व्यापारी आणि त्याच्या सीए विरुद्ध नोंदवलेल्या रू.113 कोटी च्या फसवणूक आणि बनावटगिरी च्या खटल्या संदर्भात ही छापे मोहीम होती.