झारखंड-ओडिसा तील मद्य व्यावसायिकावर आयकर विभागा ची झाडा झडती सुरू असतानाच आता "अधिकाऱ्यांची पसंद" असलेल्या बड्या मद्य व्यावसायिकावर आयकर विभागाकडून छापे सुरू असून सदर बड्या मद्य निर्मिती कंपनीच्या मुंबईतील कार्यालयांची झडती सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की विभागाचे अधिकारी या व्हिस्की निर्मात्याच्या मुंबईच्या आवारात झडती घेत आहे.
या बड्या समूहाच्या मालकीचे नऊ बॉटलिंग युनिट्स, एक डिस्टिलिंग युनिट आणि वीस पेक्षा जास्त जॉब वर्क वर आधारित उत्पादन युनिट्स आहेत असे समजते.