अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यां त्यांच्या प्रतिनियुक्ति वरील कर्मचार्यांकडून घेतलेल्या सेवांवरील कर आकारणी बद्दल केंद्रीय जीएसटी कडून आलेल्या नोटिसांना आव्हान देणार असल्याचे समजते.
जीएसटी विभागाच्या भूमिकेनुसार जर प्रतिनियुक्ती वर असलेल्या मूळ कंपनी च्या कर्मचार्याला त्याने भारतातील कंपनीला प्रदान केलेल्या सेवांसाठी भारतातील कंपनीकडून पगार दिली जातो .अश्या कर्मचार्याची प्रतिनियुक्ती जीएसटी च्या अधीन आहे. जीएसटी कायद्यानुसार भारतातील कंपनी ही सेवा प्राप्तकर्ता असल्याने सदर कर्मचार्या द्वारे प्रदान केलेल्या सेवा ह्या कायद्यानुसार "मनुष्यबळाचा पुरवठा" असल्याने भारतीय कंपनी या मानीव पुरवठ्याच्या मूल्यावर प्रचलित दराने कर भरण्यास जबाबदार आहेत.
यास प्रतिवाद करताना कंपनीकडून असा युक्तिवाद केला जात आहे की मूळ कंपनी आणि तीची भारतीय शाखा यांच्यातील व्यवहार हा मनुष्यबळाचा कर पात्र *पुरवठा* ' मानला जाऊ शकत नाही म्हणून या वर जीएसटी लागु करता येत नाही.
प्राप्त माहितीनुसार देशभरात जारी केलेल्या नोटीसा पैकी काही बहुराष्ट्रीय कंपन्यां नी अंशतः कर भरला आहे .मात्र राहिलेली थकबकी, विभागाकडून आकारण्यात येणारा दंड आणि व्याज यास त्या आव्हान देत आहेत.