छत्रपती संभाजीनगरमध्ये व्यावसायिकांवर मागील आठवड्यात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात करोडोंचे घबाड सापडले असे सूत्रांकडून समजते.
या दरम्यान सुमारे १३०० कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आले असून सहा कोटींची रोकड, चार कोटींचे दागिने, मौल्यवान हिरे आदी चीजवस्तू हस्तगत केल्याचे समजते.
विशेष म्हणजे यावेळी एसीमध्ये पेन ड्राइव्ह तर कचरा कुंडीत कागदपत्रे मिळून आली होती.
४ डिसेंबरपर्यंत ही छापेमारी सुरू होती. पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील आयकर अन्वेषण विभागाच्या ३०० ते ३५० अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर मधील आठ ते दहा व्यावसायिक व त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयांवर छापे टाकत झडती घेतली होती.