निर्धारणा वर्ष 23- 24 साठी आयकर विवरण पत्र दाखल करण्यात ची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे . या बाबत आय कर विभागाने आवाहन केले आहे.
जर देय दिनांकास किंवा त्यापूर्वी दाखल करण्यात आलेल्या मुळ कर विवरण पत्रा मध्ये कोणतीही विसंगती किंवा चूक झाली असल्यास आयकर कायदा 1961 चे कलम 139 (5) अंतर्गत निर्धारणा वर्ष 2023- 24 साठी सुधारित आयकर रिटर्न विलंब शुल्क शिवाय 31 डिसेंबर 2023 पर्यंत सादर केले जाऊ शकते.
तसेच आयकर कायदा 1961 चे कलम 139 (4) अंतर्गत निर्धारणा वर्ष 2023-24 साठी प्रलंबित आयकर रिटर्न 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह ही फाईल केले जाऊ शकते .
सरळ आणि सुरक्षित स्वरूपात आयकर विवरण पत्र दाखल करण्यासाठी www. incometax. gov.in वर लॉगइन करावे.