बोगस जीएसटी नोंदणी ला पायबंद व्हावा या हेतूने मध्ये केंद्रीय जीएसटी नियम, २०१७ च्या नियम ८ मध्ये सुधारणा करण्यात आली असून बायोमेट्रिक- आधारित आधार प्रमाणीकरणासाठी डेटा विश्लेषण आणि जोखीम पॅरामीटर्सच्या आधारे आणि अर्जासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांची मूळ प्रत, अर्जदाराचा फोटो घेऊन, जीएसटी पोर्टलवर अर्जदाराची ओळख व कागद पत्रे पडताळणी करणे आवश्यक केले आहे .
2. ही पद्धती जीएसटी नेटवर्क ने ३० ऑगस्ट २०२३ पासून पुद्दुचेरीमध्ये आणि ७ नोव्हेंबर २०२३ पासून गुजरातमध्ये आणली आहे.
3.या नुसार आता दस्तऐवज पडताळणी आणि अपॉइंटमेंट बुकिंग प्रक्रियेसाठी फॉर्म जीएसटी REG-01 मध्ये अर्ज केल्यानंतर, अर्जदाराला खालील दोन पैकी एक लिंक ई-मेलद्वारे प्राप्त होईल,
(a) OTP-आधारित आधार प्रमाणीकरणासाठी लिंक किंवा
(b) बायोमेट्रिक-आधारित आधार प्रमाणीकरण आणि दस्तऐवज पडताळणीसाठी जीएसटी सुविधा केंद्र (GSK) ला भेटी साठी अपॉईंटमेंट बुक करण्यासाठीची लिंक
4. जर अर्जदाराला मुद्दा 3 (a) मध्ये नमूद केल्यानुसार OTP-आधारित आधार प्रमाणीकरणासाठी लिंक प्राप्त झाली, तर सध्याची प्रक्रिया पुढे जाऊ शकते.
5. तथापि, अर्जदाराला मुद्दा 3(b) मध्ये नमूद केल्यानुसार लिंक प्राप्त झाल्यास, ई-मेलमध्ये प्रदान केलेली लिंक वापरून नियुक्त GSK ला भेट देण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करणे आवश्यक असेल. एकदा अर्जदाराला ई-मेल (अपॉइंटमेंट कन्फर्मेशन ई-मेल) द्वारे भेटीची पुष्टी मिळाल्यावर, निवडलेल्या वेळापत्रकानुसार तो नियुक्त GSK ला भेट देऊ शकेल.
6. GSK च्या भेटीच्या वेळी, अर्जदाराने खालील तपशील सोबत बाळगणे आवश्यक आहे.
(a) अपॉइंटमेंट कन्फर्मेशन ई-मेलची एक प्रत (हार्ड/सॉफ्ट).
(b) सूचना ई-मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे अधिकारक्षेत्राचे तपशील
(c) आधार क्रमांक
(d) मूळ दस्तऐवज जे अर्जासोबत अपलोड केले गेले होते, जे सूचना ई-मेलद्वारे कळविण्यात आले होते.
7. जीएसटी अर्ज REG-01 नुसार आवश्यक असलेल्या सर्व व्यक्तींसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि दस्तऐवज पडताळणी GSK येथे केली जाईल.
8. अर्जदाराने ई-मेलमध्ये सूचित केल्यानुसार अर्जासाठी विशिष्ट कालावधीत बायोमेट्रिक पडताळणीसाठी अपॉइंटमेंट निवडणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांमध्ये, बायोमेट्रिक-आधारित आधार प्रमाणीकरण प्रक्रिया आणि दस्तऐवज पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एआरएन तयार केले जातील.
9.GSK चे कामकाजाचे दिवस आणि तास संबंधित राज्यातील प्रशासनाद्वारे असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार असतील.
सध्या पुदूच्चेरी व गुजरात राज्यात लागू करण्यात आलेली पध्दती लवकरच इतर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सुरू केली जाईल.
https://www.gst.gov.in/newsandupdates/read/611