बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाचे छापे - पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये कारवाई
आयकर विभागाने पुणे, पिंपरी चिंचवडमधील ५ बड्या बिल्डर्सवर छापे टाकले असून, स्थानिक व्यावसायिक आणि राजकीय वर्तुळात याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
प्राप्तिकर विभागाच्या पुणे विभागातील विविध पथकांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास, पुणे पिंपरी चिंचवड येथे बड्या ग्रुपशी संबंधित विविध कार्यालये आणि निवासस्थानांवर एकाच वेळी सहा ठिकाणी छापे टाकले.
विविध वाहनांमधून आलेल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी गुप्तता बाळगून सदर ग्रुपच्या विविध कार्यालयांमध्ये प्रवेश केला. तंतोतंत केलेल्या पूर्वतयारी मुळे या छाप्यांत महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत करण्यात आली, ज्याचा त्वरित आणि सखोल तपास सुरू झाला असला तरी या प्रकरणाबद्दलचे तपशील अज्ञात आहेत. जसजसे आयकर विभागाची चौकशी पुढे जाईल तसा या कारवाई चा उलगडा होईल.
तर पुण्यात वाकड व किवळे भागातही अशीच प्राप्तिकर विभागाने कारवाई केल्याची चर्चा आहे.