३० नोव्हेंबर पर्यंत जीएसटी ची "ही" महत्वाची कामे करून घ्या, नंतर...

GST 4 YOU


३० नोव्हेंबर पर्यंत जीएसटी ची ही महत्वाची कामे करून घ्या, नंतर....

आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील आवक कर परतावा (ITC) घ्यायचा राहिला असेल तर त्याचा ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत लाभ घेता येईल.

२०२२-२३ या मागील आर्थिक वर्षासाठी ITC चा लाभ ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत किंवा आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी वार्षिक विवरण पत्र GSTR-9 जर त्या आधी सादर केलं असेल त्यापैकी जे लवकर असेल त्या पर्यन्त घेता येतो .


तसेच जीएसटी नियम, २०१७ च्या नियम ३७अ नुसार करदात्यांनी इनव्हॉइस किंवा डेबिट नोटवर घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) ,ज्याचे तपशील त्यांच्या पुरवठादाराने त्यांच्या GSTR-1/ IFF मध्ये दिले आहेत परंतु  या कालावधीसाठी चे विवरण पत्र GSTR-3B सदर पुरवठादाराने ३० सप्टेंबर पर्यंत सादर केले नाही व कर भरला नाही ,पण कर दात्याने  मात्र अशा इनव्हॉइस किंवा डेबिट नोटच्या संदर्भात इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला गेला असेल तर हे क्रेडिट रिव्हर्स करावे लागेल.

या  नुसार , ३० नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी  अशा करदात्यांनी ITC ची उक्त रक्कम परत करणे आवश्यक आहे.

जर असे आयटीसी कर दात्याने स्वतः हुन ३० नोव्हेबरपर्यंत परत  केले नाही तर ते व्याजासकट वसूल केले जाऊ शकते.

मात्र पुढे जेव्हा केव्हा पुरवठादार जीएसटी GSTR 3B च्या माध्यमातून हा  कर भरणा करेल, त्यावेळेस करदाता हे आयटीसी पुन्हा घेऊ शकतो.