हॉटेलिंग क्षेत्रात खळबळ-बड्या फूड डिलिव्हरी कंपन्यांना जीएसटी कडून ७५० कोटी रुपयांच्या नोटिसा-

GST 4 YOU


हॉटेलिंग क्षेत्राचा मोठा हिस्सा  असलेल्या दोन बड्या फूड डिलिव्हरी कंपन्यांना जीएसटी कडून ७५० कोटी रुपयांच्या नोटिसा आल्याने खळबळ उडाली आहे.

बड्या फूड डिलिव्हरी कंपन्यांना जीएसटी कडून सुमारे ७५० कोटी रुपयांच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
जीएसटी विभागाच्या मता नुसार अन्न वितरण ही सेवा असल्याने, या फूड डिलिव्हरी कंपन्यांना जीएसटी भरण्यास जबाबदार आहेत. कारण ह्या कंपन्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म डिलिव्हरी फीच्या नावाखाली ग्राहकांकडून काही शुल्क घेतात.

तर या कंपन्यांच्या मते , 'डिलिव्हरी चार्ज' म्हणजे डिलिव्हरी पार्टनर जे घरोघरी अन्न पोहोचवायला जातात त्यासाठी जो खर्च करतात, त्याची ही रक्कम आहे.तसेच या कंपन्या फक्त ग्राहकांकडून तो खर्च गोळा करतात आणि वितरण  करणार्या  भागीदारांना देतात. 

मात्र या विषयावर कंपन्या व जीएसटी अधिकाऱ्यांत मत-मतांतरे आहेत.

२०२२ मध्ये, या कंपन्याना त्यांच्या ऑर्डर चार्जेस वर ५ टक्के दराने कर जमा करण्यास सांगण्यात आले. त्याआधी जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत रेस्टॉरंट्स फक्त कर भरणा करत  होते.