४८ बोगस फर्म व्दारे १९९ कोटी चा जीएसटी चोरी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश-एम के ट्रेडर्स च्या मालकासह तीन जण ताब्यात

GST 4 YOU
४८ बोगस फर्म व्दारे १९९ कोटी चा जीएसटी चोरी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश-
एम के ट्रेडर्स च्या मालकासह तीन लोकांना पकडण्यात आले


केंद्रीय जीएसटी, दिल्ली पूर्व आयुक्तालया ने “ऑपरेशन क्लीन स्वीप” अंतर्गत १९९ कोटी रुपये हून अधिक बोगस आयटीसी लाभ घेणाऱ्या ४८ बोगस फर्म समाविष्ट असलेल्या एका सिंडिकेट चा पर्दाफाश केला.
सीजीएसटी ,दिल्ली पूर्व ने गुप्त माहितीच्या आधारे बोगस बिलर्स च्या विरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे. या “ऑपरेशन क्लीन स्वीप” अंतर्गत गुप्त माहिती संकलना बरोबर डेटा विश्लेषणाच्या सहाय्याने ही कारवाई केली गेली.
या मोहिमेत सुरुवातीला एकूण ४८ बोगस फर्म ची ओळख पटवण्यात आली. या फार्म एकतर अस्तित्वात नाहीत किंवा खोटी कागदपत्रे तयार करून  निर्माण केल्या गेल्या आहेत.या सर्व फर्म वस्तू किंवा सेवा यांचा पुरवठा न करताच केवळ कागदावर व्यवहार दाखवत होत्या.

या गुन्ह्याबद्दल एम के ट्रेडर्स च्या मालकासह तीन लोकांना पकडण्यात आले असून त्यांना दोन आठवडे न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
कारवाई दरम्यान ५५ विविध कंपन्यांचे शिक्के, अनेक सिमकार्ड आणि आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे आणि तसेच अनेक वीजबिलांसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
या सिंडिकेट मधील इतरांची ओळख पटवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.