सप्लायर ने न भरलेल्या जीएसटी चे आयटीसी क्रेडिट ३० नोव्हेंबर पर्यंत परत करावे लागणार

GST 4 YOU
सप्लायर ने न भरलेल्या जीएसटी चे आयटीसी  क्रेडिट ३० नोव्हेंबर पर्यंत परत करावे लागणार 


जीएसटी नियम, २०१७ च्या नियम ३७अ नुसार करदात्यांनी  इनव्हॉइस किंवा डेबिट नोटवर घेतलेले इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC)  ,ज्याचे तपशील त्यांच्या पुरवठादाराने त्यांच्या GSTR-1/ IFF मध्ये दिले आहेत परंतु  या कालावधीसाठी चे विवरण पत्र GSTR-3B त्याने  ३० सप्टेंबर पर्यंत सादर केले नाही व कर भरला नाही ,पण कर दात्याने  मात्र अशा इनव्हॉइस किंवा डेबिट नोटच्या संदर्भात इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला गेला असेल तर हे क्रेडिट रिव्हर्स करावे लागेल.

या कायदेशीर तरतुदी नुसार , ३० नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी फॉर्म GSTR-3B  भरताना, अशा करदात्यांनी ITC ची उक्त रक्कम परत करणे आवश्यक आहे.

 करदात्यांच्या सुविधेसाठी, २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी  नियम ३७अ नुसार परत करणे आवश्यक असलेल्या आयटीसी ची रक्कम संबंधित कर दात्याला कळवण्यात आली आहे. करदात्याच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर हा तपशील पाठविला गेला आहे.

करदात्यांनी  ३० नोव्हेंबर २०२३  किंवा त्यापूर्वी    असा ITC  वापरला असेल तर तो परत केला आहे याची खात्री GSTR- 3B च्या रकाना 4(B)(2) व्दारे  दर्शवून सदर विवरण पत्र भरावे.

जर असे आयटीसी कर दात्याने स्वतः हुन ३० नोव्हेबरपर्यंत परत  केले नाही तर ते व्याजासकट वसूल केले जाऊ शकते.
मात्र पुढे जेव्हा सप्लायर जीएसटी GSTR 3B च्या माध्यमातून हा  कर भरणा करेल, त्यावेळेस करदाता हे आयटीसी पुन्हा घेऊ शकतो.
https://www.gst.gov.in/newsandupdates/read/613