रद्द जीएसटी नोंदणी पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज करण्याच्या कालमर्यादेत तीन पट वाढ

GST 4 YOU


रद्द जीएसटी नोंदणी पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज करण्याच्या कालमर्यादेत तीन पट वाढ करण्यात आली आहे.

जीएसटी परिषदेच्या शिफारशीनुसार सरकारने जारी केलेली अधिसूचना 38/2023- केंद्रीय कर दि.04.08. 2023 च्या नोंदणी संबंधीत तरतुदी 1 ऑक्टोबर 2023 पासून अमलात आल्या असून आता रद्द झालेली जीएसटी नोंदणी पुनर्जीवित करण्यासाठी अर्ज करण्याची कालमर्यादा नोंदणी रद्द चे आदेश मिळाल्या पासून 30 दिवसा वरून  90  पर्यंत वाढवली गेली आहे.

 तर जिथे नोंदणीकृत व्यक्ती 90 दिवसांच्या आत  पुनर्जीवित करण्या साठी चा अर्ज करण्यात अयशस्वी ठरली असेल  तर या संदर्भातील योग्य कारणे दिल्यास जीएसटी आयुक्त  किंवा त्यांनी या संदर्भात प्राधिकृत केलेले अधिकारी ( सह किंवा अपर आयुक्त)  हे  पुढे  180 दिवसांपर्यन्त मुदतवाढ देऊ शकतात..

https://taxinformation.cbic.gov.in/view-pdf/1009820/ENG/Notifications