जीएसटी परिषद वर्गीकरण निश्चित करू शकत नाही परंतु दरांची शिफारस करू शकते: मा.उच्च न्यायालय

GST 4 YOU


जीएसटी परिषद वर्गीकरण निश्चित करू शकत नाही परंतु दरांची शिफारस करू शकते असे नमूद करून मा.मद्रास उच्च न्यायालयाने फ्लेवर्ड दुधाच्या वर्गीकरणाला आव्हान देणाऱ्या याचिकेला अनुमति दिली.
मा. न्यायालयाने मे. पार्ले अग्रो प्रायव्हेट लिमिटेड वि. युनियन ऑफ इंडिया व इतर [W.P. क्र. 16608 आणि 16613 / 2020  दिनांक 31 ऑक्टोबर 2023] च्या रिट याचिकेला अनुमती दिली.
आणि असा निर्णय दिला की फ्लेवर्ड दुधाचे कस्टम टॅरिफ कायदा, 1975 च्या शीर्षक 0402 अंतर्गत वर्गीकरण केले जावे आणि  त्यावर अधिसूचना 1/2017- केंद्रीय कर (दर) दि.28 जून 2017 च्या प्रथम परिशिष्ट क्रमांक 8 प्रमाणे 5% कर  आहे असे सांगितले.
Tags