जीएसटी बरोबरच आयकर महसुल संकलन वेगाने वाढत आहे. या बाबत बोलताना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, सरकार चालू आर्थिक वर्षासाठी निर्धारित ₹18.23 लाख कोटी प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य पार करू शकेल.
गुप्ता यांनी पुढे सांगितले कि अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे आणि 15 डिसेंबरपर्यंत आगाऊ कर महसूलाचा तिसरा हप्ता आल्यावर पूर्ण वर्षाच्या कर संकलनाचे चित्र स्पष्ट होइल.
सरकारी आकडेवारीनुसार, या चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर दरम्यान निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 22% वाढून ते ₹10.60 लाख कोटी इतके आहे. एकूण (ग्रोस)प्रत्यक्ष कर संकलन 17-18% दराने, तर निव्वळ (नेट) प्रत्यक्ष कर संकलन 22% दराने वाढत आहे . याच वेळी कर परतावे देखील जारी होत आहोत. 1 एप्रिल ते 9 नोव्हेंबर दरम्यान एकूण 1.77 लाख कोटी रुपयांचे परतावे जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, विभागाला अंदाजापेक्षा जास्त कर संकलनाबद्दल काही शंका नाही,” असे गुप्ता यांनी सांगितले.
2023-24 च्या अर्थसंकल्पात प्रत्यक्ष कर संकलन ₹18.23 लाख कोटी अनुमानित आहे, जे गेल्या आर्थिक वर्षातील ₹16.61 लाख कोटींच्या तुलनेत 9.75% ने जास्त आहे.