राज्य जीएसटी आयुक्तपदी "या" ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती... यापूर्वीचे आयुक्त प्रतिनियुक्ती वर केंद्रात

GST 4 YOU



महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभाग (जीएसटी) आयुक्तपदी आशिष शर्मा या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारने केले असून यापूर्वीचे आयुक्त राजीव मित्तल यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर नेमणूक झाली आहे असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजते.

आयआयटी दिल्लीचे स्नातक असलेले आशिष शर्मा १९९७ बॅच चे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी असून त्यांनी यापूर्वी साताऱ्याचे प्रांत अधिकारी तसेच वाशिम व धाराशिव येथे जिल्हाधिकारी पदी तसेच त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त म्हणून काम केले आहे.