जीएसटी संकलन वाढीचे कारणे दाखवा नोटिसा हे कारण नाही...... तर सकारात्मक आर्थिक घडामोडींचा परिणाम हे खरे कारण

GST 4 YOU


जीएसटी संकलन वाढीचे नुकत्याच जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिसा हे कारण नाही तर सकारात्मक आर्थिक घडामोडींचा परिणाम हे खरे कारण आहे असे स्पष्टीकरण केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (CBIC) यांचे वतीने करण्यात आले. नुकत्याच ऑक्टोबर 23 या महिन्यात झालेले महसूल संकलन 1.72 लाख कोटी रुपये, हे जीएसटी अंमलबजावणीनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे आहे.

मात्र असे जरी असले तरी विभागाने जारी केलेल्या नोटिसांमुळे महसूल वाढ झाली किंवा केवळ ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना बजावण्यात आलेल्या नोटिसांमुळे ही वाढ झाली असे नाही तर ही वाढ पूर्ण देशात घडलेल्या आर्थिक घडामोडी चा परिणाम आहे. गेल्या महिन्यात केवळ देशांतर्गत जीएसटी पुरवठ्यातून महसूल वाढ झाली नाही, तर ती आयातीतून मिळालेल्या आयजीएसटी मुळे पण आहे .मागील महिन्यांच्या तुलनेत आयात ही जास्त होती. कंपन्या त्यांचा साठा आणि इन्व्हेंटरीज वाढवत आहेत तसेच सणासुदीच्या काळातील झालेल्या व्यवसाय वृद्धीचाही मोठा वाटा आहे .... जीएसटीमध्ये झालेली ही वाढ खूपच चांगली स्थिती दर्शवते आहे.